जळगाव । दिव्यांग व्यक्ती हा सुध्दा समाजाच्या एक महत्वपूर्ण घटक आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासोबत रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती साठी प्रयत्नशील आहे .दिव्यांगाची सेवा हीच ईश्वरीय सेवा असून मतदार संघ मोतिबिंदू मुक्त करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आमदार स्थानिक विकास निधी व जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून धरणगाव व जळगाव ग्रामीण तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनार्थ साहित्य वाटपाचा व मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर कार्यक्रम धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार निधीतून दिव्यांगासाठी राज्यातील हा पहिला उपक्रम असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष सलीम पटेल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, तहसीदार श्री. राजपूत, गटविकास अधिकारी सुभाष जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, जि.प.सदस्य गोपाल चौधरी, प्रतापराव पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील, डॉ सोनवणे, डॉ. चव्हाण, पं.स. उपसभापती प्रेमराज पाटील, अंजली बावीस्कर, नानाभाऊ सोनवणे, राजेंद्र महाजन,पप्पू भावे उपस्थित होते.
साहित्याचे वाटप
पद्मश्री डॉ.धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त ना.पाटील यांच्याहस्ते 300 दिव्यांगांना दर्जेदार तीनचाकी सायकली, व्हीलचेअर, कॅलिपर्स,पोलियो कॅलिपर्स,कृत्रिम हात, जयपूर फूट, कुबड्या, अंधकाठी, वाकिंग स्टिक, कर्ण यंत्र, मतिमंद मुलांसाठी एम.आर. किट तसेच कृत्रिम उपकरणे आदि 22 प्रकारच्या 300 दिव्यांगांना 388 साहित्याचे वाटप केले.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन देणार
यावेळी ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, शासन समाजातील सर्व घटकांच्या विकासास प्राधान्य देत आहे. आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून 10 टक्के रक्कम दिव्यांगाच्या विकासासाठी खर्च करण्याबाबत निर्देश दिलेले आहे. त्यानुसार प्रथमच या निधीतून दिव्यांगाना साहित्याचे वाटप करण्यात येत असून या वर्षी 10 लाखाचा निधी दिव्यांगांना साहित्याचे वाटप करण्यासाठी खर्च करण्याची घोषणा ना.पाटील यांनी केली. धरणगाव व जळगाव तालुक्यातील गरजू नागरीकांना मुंबई येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये नेऊन आतापर्यंत 70 नागरीकांच्या न्जीओप्लॅस्टी तर 22 रुग्णांच्या बायपास सर्जरी केल्या आहेत. तर मागील महिनाभरात 23 कँन्सर रुग्णांना जीवनदायी योजनेतून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्यात आल्याचेही ना. पाटील यांनी सांगितले. नगरपालिकेच्या वतीने स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र चालविले जाणार असून तालुक्यातील 100 हुशार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुनर्वसन केंद्राचे समन्वयक एस.पी.गणेशकर यांनी केले. सूत्रसंचालन मुक्ती फाऊंडेशनचे मुकूंद गोसावी व किरण अग्निहोत्री यांनी केले.तर आभार जि. प. चे माजी सदस्य विश्वनाथ पाटील यांनी मानले. कार्यक्रमास राजेंद्र महाजन, नगरसेवक मोहम्मद पठाण,विलास महाजन, जितेंद्र न्ह्यायडे,कमलेश बोरसे, राजेंद्र ठाकरे,रविंद्र जाधव, लक्ष्मण माळी, विनोद रोकडे,,उमेश चौधरी, डॉ. प्रसन्ना रेदासनी, राजेश यावलकर, मनोज पांडे ,कमलाकर पाटील, यांचेसह आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच दिव्यांग व्यक्तींचे नातेवाईक व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.