दिव्यांगांना आज उपकरणांचे वाटप

0

जळगाव। केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे दिव्यांगांना विविध अत्याधुनिक उपकरणांच्या वाटपाचा कार्यक्रम 9 जरूनरोजीसागरपार्क मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून 10 हजार लोक बसतील असा मंडप उभारला आहे. हेलिपॅडची व्यवस्थाही करण्यात आली.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा व वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित राहणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील 2301 लाभार्थींना 19 प्रकारातील 4082 उपकरणे वाटप केली जातील.कार्यक्रम स्थळाची पाहणी प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील, आरोग्यदूत रामेश्वर नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जीएम फाऊंडेशनचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांच्यासह एलिम्कोचे महाप्रबंधक ए. के.गुप्ता, उप प्रबंधक संजयसिंग यांनी केली.