दिव्यांग व्यक्तींच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करणार

0

पुणे । दिव्यांग व्यक्तींच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारी प्रक्रिया ही अधिकाधिक सुटसुटीत तसेच सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार अनिल शिरोळे यांनी शनिवारी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात आयोजित केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकाराकरिता मंत्रालयाच्या सहयोगाने आयोजित शहरातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोफत वाटप पूर्वमूल्यांकन व नाव नोंदणी शिबिराच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार मेधा कुलकर्णी माधुरी मिसाळ, नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे, स्वाती लोखंडे, मंजुश्री खर्डेकर, डॉक्टर माधव भट, विजय कान्हेकर, संजय राजणे उपस्थित होते.

खासदार शिरोळे यांनी कानपूर येथील अलिम्को या कंपनीबरोबरच महापालिका, जिल्हा प्रशासन, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र तसेच जिल्हा समाज कल्याण विभाग यांच्या सहयोगाने आयोजित या शिबिरात शहर व परिसरातील एकूण 1841 जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. तसेच त्यांच्या तपासणीनंतर मूल्यांकन करून एकूण 1152 लाभार्थी दिव्यांगांना आगामी कालावधीमध्ये आवश्यक ते कृत्रिम अवयव जसे की फूट, व्हील चेअर, तीन चाकी सायकल, श्रवण यंत्र, अंध व्यक्तींसाठी स्मार्ट मोबाईल फोन या वस्तूंचे वाटप होणार आहे असेही शिरोळे यांनी सांगितले.