यावल- तालुक्यातील थोरगव्हाण येथे दिव्यांग व्यक्तींना महाराष्ट्र शासनाने 2014 पासून ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून तीन टक्के निधी देण्याची तरतूद केली असताना थोरगव्हाण ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ होत असल्याची तक्रार सुकलाल श्रीपत भालेराव यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे करण्यात आली आहे. सुकलाल श्रीपत भालेराव 50 टक्के दिव्यांग असून थोरगव्हाण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांना दिव्यांग व्यक्तींना शासनाकडून दिल्या जाणारा तीन टक्के राखीव निधी मिळण्यासाठी शासन परीपत्रक दिले आहे.परीपत्रकानुसार तीन टक्के राखीव निधीची मागणी करण्यात आली मात्र दखल न घेण्यात न आल्याने त्यांनी 13 फेब्रुवारीपासून यावल तहसीलबाहेर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार आपण वरीष्ठ अधिकार्यांकडे विचारणा करून दिव्यांग व्यक्तींना दिल्या जाणार्या निधीचे वाटप करणार असल्याचे थोरगव्हाण ग्रामसेवक कविता बाविस्कर म्हणाल्या.