मुंबई । प्रताप क्रीडा मंडळाचे सदस्य परशुराम यादव यांची कन्या दिव्या यादव हिची मुंबई शहर कबड्डी संघटनेच्या कुमारी गट संघात निवड झाल्याबद्दल स्थानिक नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
दिव्या ही दादरच्या अमरहिंद मंडळाकडून कबड्डी खेळते. 25 ते 28 नोव्हेबर या कालावधीत वाळवा – सांगली येथे होणार्या 44व्या कुमार, कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ती मुंबई शहर संघाचे प्रतिनिधित्व करेल. या वेळी नगरसेवक सरवणकर, मंडळाचे विश्वस्त सुधीर खानोलकर तिला या स्पर्धेकरिता तसेच उज्ज्वल भाविष्याकरिता शुभेच्छा दिल्या.