दि जळगाव पीपल्स बँकेला सर्वोत्तम बँक पुरस्कार

0

जळगाव । दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेला सोमवार 6 मार्च रोजी दि महाराष्ट अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन, मुंबई, तर्फे शेड्युल्ड बँका या विभागातून सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सहकार मंत्री सुभाषराव देशमुख, महाराष्ट अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते देण्यात आला.

समारंभात मान्यवरांनी बँकेविषयी गौरवद्गार काढले. बँकेने शेडयुल्ड दर्जाचा मिळवीला आहे. स्थापनेपासून सहकार क्षेत्रात विश्‍वासार्ह बँकिंगची परंपरा कायम ठेवली आहे. पुरस्कार बँकेस शेडयुल्ड दर्जा मिळाल्याबद्दल विशेष पुरस्कार म्हणून सन्मान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्यात बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, संचालक डॉ.सी.बी.चौधरी, दादा नेवे, प्रा.विलास बोरोले, सुनिल पाटील, रामेश्‍वर जाखेटे आदी उपस्थित होते.