दि.10 रोजी मोफत भव्य किडनीरोग निदान शिबिराचे आयोजन.

शहादा,दि.17

सहकारमहर्षी स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या जयंती निमित्त श्री.पी.के.अण्णा पाटील फाउंडेशन, शहादा व विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळ (VSGGM) यांच्या संयुक्त विद्यमाने दि.10 ऑक्टोंबर 2023 मंगळवार रोजी मोफत भव्य किडनीरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

परिसराचे भाग्यविधाते स्वर्गीय अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येते.यावर्षी दि.10 ऑक्टोंबर 2023 मंगळवार सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत अभियांत्रिकी महाविद्यालय,पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात शिबिर घेण्यात येणार आहे.शिबिरात सेवा विनामूल्य देण्यात येतील.हे शिबीर फक्त रोगनिदान म्हणजे तपासणी शिबीर आहे.किडनीरोग तज्ज्ञांद्वारे तपासणी व उपचारा संबंधित सल्ला दिला जाईल.किडनीरोग संबंधित रक्त व लघवी (21प्रकारच्या) तपासण्या मोफत करण्यात येतील.शिबिराच्या ठिकाणी दि. 8 व 9 ऑक्टोंबर रोजी नोंदणीकृत रुग्णांचीच रक्त व लघवी तपासणी करण्यात येईल.तपासणीस येणा-या रुग्णांसाठी विशेष सुचना अशा, रूग्णांनी येतांना आपले जुने रक्ताचे रिपोर्ट, एक्सरे किंवा ईतर रिपोर्ट व औषधांचे प्रीस्क्रीप्शन, औषधे असतील तर ते सोबत आणावे.पुढील उपचारासाठी आपणास सबंधीत तज्ञ डॉक्टर सल्ला देतील त्याप्रमाणे आपणास निर्णय घ्यायचे आहेत.योग्य नियोजनासाठी आपली नावनोंदणी आवश्यक आहे तरी दि.5ऑक्टोबर 2023 पर्यंत खालील ठिकाणी आपन प्रत्यक्ष किंवा फोन करुन आपले नावनोंदणी करुन घ्यावी.ह्या शिबिरात फक्त नोंदणीकृत रुग्णांचीच तपासणी करण्यात येईल म्हणून आपली पूर्वनोंदणी करून घेणे गरजेचे आहे. या शिबिरात तपासणी डॉ. जितेंद्र चौधरी किडनीरोग तज्ञ

विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, धुळे यांच्यासह तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रा. मिलिंद जगन्नाथ पाटीलअभियांत्रिकी महाविद्यालय, लोणखेडा

(मो. 8208042064),जय अम्बे पॉलीक्लिनिक,अंबाजी मंदिर जवळ, खेतिया रोड, शहादा

(मो. 7447797364) या शिबिरासाठी सौजन्य रोटरी क्लब ऑफ बारडोली (फिरते रक्त तपासणी वाहन) यांचे सहकार्य लाभले आहे.शिबीराचे आयोजक

श्री.पी.के.अण्णा पाटील फाउंडेशन,विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळ यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले असल्याची माहिती डॉ.प्रफुल्ल पाटील यांनी दिली आहे.