दीपनगरजवळ महामार्गावर रात्रीच्या वेळी लुटारुंचा धुमाकूळ

0

वरणगाव । अज्ञात आठ ते दहा टवाळखोरांनी दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या नविन प्रवेशद्वाराजवळ ये-जा करणार्‍या वाहनांवर लुटीच्या उद्देशाने दगड गोटे मारुन वाहन चालकांना घाबरवण्याचा प्रयत्न धुमाकूळ घातल्याचा प्रकार गुरुवार 9 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडला. दीपनगर येथील नविन प्रवेशद्वाराजवळ 9 रोजीच्या पहाटे 4 वाजेला काही अज्ञात आठ ते दहा लुटारुंनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर येणार्‍या जाणार्‍या वाहनांना अडविण्याच्या प्रयत्नात त्यांच्यावर दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न केला.

वाहनांचे झाले नुकसान

पंरतु सकाळी थंडी असल्याने वाहनांच्या काचा बंद असल्याने चालकाला व गाडीत बसलेल्या प्रवाशांना काही ईजा झाल्या नसल्या तरी वाहनांचे दगड फेकीमुळे काचा फुटल्या व वाहनाचेही नुकसान झालेले आहे. यातील भुसावळकडे जाणारी काही वाहने ही, काही काळ फेकरी तोल नाक्यावर ही थांबले होती.

वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण

या ठिकाणी या लुटारुंच्या धुमाकुळामुळे वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटने संदर्भात भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला रात्री 4.15 काहींनी दूरध्वनी वरुन संपर्क साधून माहिहती दिली असता हेडकॉन्स्टेबल माळी यांनी गाडी पाठवतो असे सांगीतले पंरतु पोलीसांची गाडी उशिरा आल्याने लुटारू घटना स्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीसांनी नियमीत गस्त न घातल्याने अशा घटना या महामार्गावर नेहमी घडत असतात.

तक्रार देण्याचीही भीती

दरम्यान, वरणगाव रोड परिसरात वारंवार अशाप्रकारच्या घटना घडत असतात. मागील वेळेस अशाच प्रकारे मोटारसायकलस्वारावर दगडफेक करुन लुटीची घटना घडली होती. या घटनांना आळा बसत नसून नागरिकांना रात्री अपरात्री जीव मुठीत घेवून येथून ये-जा करावी लागते. मात्र पोलीसांचा ससेमिरा नको म्हणून कुणी ही पोलीसात तक्रार देण्यास पुढे येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या बाबींकडे लक्ष देवून रात्रीच्या वेळेस गस्त घालण्यासाठी पथकाची नियुक्ती करुन नियमितपणे टेहाळणी करण्याची मागणी वरणगाव परिसरातील नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. जेणेकरुन या भागातील चोरी व रस्तालुटीसारखे प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल.