दीपनगरातील 660 मेगावॅट प्रकल्पाला 1 मे पासून गती

0

महानिर्मितीचे प्रकल्प संचालक व्ही. थंगापंडीयन यांची माहिती

भुसावळ- दीपनगरातील 660 मेगावॅट प्रकल्पाच्या कामाला 1 मे पासून गती येणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक व्ही.थंगापंडीयन यांनी येथे दिली.
शनिवारी महानिर्मिती प्रकल्पाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी मुख्य अभियंता पंकज सपाटे व प्रकल्पाचे उपमुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्याकडून आढावा घेतला.

यांची होती उपस्थिती
मुख्य अभियंता पंकज सपाटे, प्रकल्प स्थापत्य विभागाचे मुख्य अभियंता अनंत देवतारे, प्रकल्पाचे उपमुख्य अभियंता मोहन आव्हाड, उपमुख्य अभियंता पी. बी. देशकर, उपमुख्य अभियंता नितीन पुणेकर, नंदकिशोर देशमुख, मुंबई मुख्यालयातील मुख्य अभियंता एम. एम. कोठूळे, उपमुख्य अभियंता किरण माने, उपमुख्य अभियंता अशोक जाधव, जनसंपर्क अधिकारी आर.पी.निकम आदी उपस्थित होते. यावेळी दीपनगरातील सर्व कामगार, कंत्राटी व रोजंदारी कामगार, कंत्राटदार व पुरवठादार संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रकल्प संचालक व्ही.थंगापंडीयन यांची भेट घेवून विविध मागण्यांचे निवेदन दिले.

दीपलॉनचे उद्घाटन
प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशव्दाराचे पुजन, दीपनगरातील वसाहत भागात असलेल्या दीप लॉन या उद्यानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. 500 बाय दोन केंद्राला भेट देवून त्यांनी वीज निर्मितीचा आढावा घेतला.