दीपनगरात अवघ्या एका संचातून वीज निर्मिती

0

भुसावळ- दीपनगर केंद्रातील अवघ्या एका केंद्रातून वीज निर्मिती आहे. संच क्रमांक पाच कार्यान्वित असून संच तीन दुरुस्तीसाठी तसेच संच क्रमांक चार बॉयलर निरीक्षणासाठी बंद ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पावसाळ्यात राज्यातील वीजनिर्मिती संचांसाठी ऑस्ट्रेलिया व इंडोनेशिया या देशांतून आयात कोळशाचा वापर केला जात होता. यंदा मात्र महानिर्मितीने आयात कोळशाचा वापर बंद केल्याने दीपनगर केंद्रात सध्या डब्ल्यूसीएलचा (वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड) कोळसा वापरून वीजनिर्मिती सुरू आहे. इतरही केंद्रांच्या वीजनिर्मितीची मदार केवळ देशांतर्गत कोळशावर अवलंबून आहे. सध्या भुसावळ, परळी, नाशिक, पारस येथील जुने संच बंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.