दीपनगरात पुन्हा कोळसा चोरी, तिघांविरूध्द गुन्हा

0
भुसावळ : दिपनगर प्रकल्पातील कोळसा चोरी होण्याची घटना ताजी असतांनाच शनिवारी मध्यरात्री सुरक्षा यंत्रणेचे लक्ष चुकवून ट्रॅक्टरद्वारे कोळसा चोरी होत असतांना यंत्रणा सजग झाल्याने चोरटे पसार झाले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकासह अन्य दोघा-तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास वामन अरींगल यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर (क्र.एम.एच.19 ए.एन.3965) वरील चालक व त्यासोबतच्या अन्य दोघा-तिघांनी सहा हजार 200 रुपये किंमतीचा कोळसा चोरला मात्र सुरक्षा यंत्रणांनी हा प्रयत्न हाणून पाडला. तपास ए.एस.आय.काझी व ए.एस.आय.गंगावणे करीत आहे.