भुसावळ- दीपनगर प्रकल्पातील एक हजार मेगावॅट क्षमतेच्या संच चार व पाचमधून मंगळवारी क्षमतेपेक्षा 11 मेगावॅट अधिक अर्थात एक हजार 11 मेगावॅट वीजनिर्मिती झाली. दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात 210 मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमाक तीन सध्या बंद असल्याने केवळ प्रत्येकी 500 मेगावॅट स्थापित क्षमतेचे संच क्रमांक चार आणि पाच असे दोन संच कार्यान्वित आहेत.