दीपनगर नवीन प्रकल्पात 15 तज्ज्ञ अधिकारी नियुक्त

0

कामाला गती ; भेलला मिळाला ‘एएलओ’

भुसावळ– दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 660 मेगावॅट प्रकल्पासाठी महानिर्मितीने राज्यभरातील 15 तज्ज्ञ अधिकार्‍यांची नियुक्तीचे आदेश काढले आहेत. यामुळे आता प्रकल्पाच्या कामाला गती येणार असल्याचे महानिर्मितीच्या सूत्रांनी सांगितले.

कामाला येणार गती
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 660 मेगावॅट प्रकल्पासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकल्पाच्या प्रशासकीय नियंत्रणासाठी महानिर्मितीने राज्यभरातील 15 अधिकार्‍यांची दीपनगर प्रकल्पात नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत. अधिकार्‍यांच्या नियुक्तीमुळे दीपनगरातील नियोजित 660 मेगावॅट प्रकल्पाच्या कामाला आता गती येणार आहे. प्रकल्पाच्या भुमिपूजनापूर्वी या अधिकार्‍यांची नियुक्ती झाली. यासह या प्रकल्पाचे काम घेतलेल्या मे. भेल कंपनीस कार्यारंभ आदेशापूर्वीची एएलओ देण्यात आला आहे.

असे आहेत नियुक्त अधिकारी
नियोजीत प्रकल्पासाठी नियुक्ती झालेले अधिकारी व कंसात त्यांच्या पूर्वीचे मुख्यालय असे – आर.आर.कारडे (कोराडी), वाय.एम.इंगळे (पूणे सोलर प्रोजेक्ट), ए.ए.चव्हाण (कोराडी), ए.बी.हजारे (अमरावती सोलर प्राजेक्ट), एस.आर.गडेवार ( चंद्रपूर), ए.जी.नंदेश्वर (चंद्रपूर), ए.आर.भिसे ( मुंबई मुख्यालय) , डी.आर.शिंदे (परळी), के.एस.जोशी (परळी), पराग महाजन ( परळी), जे.डी.डकारे ( चंद्रपूर), एन.डी.तिवासकर ( कोराडी), एम.आर.बेदरे ( चंद्रपूर), एस.एस.ठाकरे ( चंद्रपूर), एन.आर. शेट्टीवार (नागपूर) आदी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.