दीपनगर प्रकल्पाच्या मुख्य अभियंतापदी विवेक रोकडे

0

भुसावळ- महानिर्मितीच्या दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 660 मेगावॅट प्रकल्पाच्या मुख्य भियंतापदी विवेक रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई मुख्यालयातून त्यांची प्रकल्पाच्या मुख्य अभियंता पदावर बदली करण्यात आली. दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 660 मेगावॅट प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन होऊन तब्बल वर्षभराचा कालावधी उलटला मात्र अद्यापही प्रकल्पाच्या कामाला गती आलेली नाही. यापूर्वी प्रकल्पाच्या मुख्य अभियंता पदाचा अतिरीक्त पदभार मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्याकडे होता. सपाटे यांनीही प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्यासाठी मुख्यालय पातळीवरुन पाठपुरावा केला होता. दरम्यान, आता महानिर्मितीने प्रकल्पासाठी स्वतंत्रपणे मुख्य अभियंता या पदावर विवेक रोकडे यांची नियुक्तीचे आदेश 31 मे रोजी काढले आहेत. रोकडे सध्या मुंबई मुख्यालयात मुख्य अभियंता या पदावर कार्यरत होते. बदलीनंतर ते सोमवार, 3 जून रोजी पदभार स्विकारतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्याकडे संच क्रमांक तीन, चार, पाचमधून वीज जनिर्मितीची अर्थात ऑपरेशन अँड मॅनेजमेंटची जबाबदारी राहणार आहे. उपमुख्य अभियंता पदावर मोहन आव्हाड हे पूर्वीप्रमाणेच कार्यभाग सांभाळतील. नवीन मुख्य अभियंता रोकडे यांच्या कार्यकाळात प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल काय? याची उत्सुकता लागली आहे.