दीपनगर प्रकल्पातील अ‍ॅप्रेंटीसधारक घेणार मुख्य अभियंत्यांची भेट

0

भुसावळ- दीपनगर प्रकल्पातील अ‍ॅप्रेंटीसधारकांना शासन दरबारी दाद मागूनही अद्याप न्याय मिळाला नसल्यामुळे अ‍ॅप्रेंटीसधारकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याबाबत दीपनगर प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांना 21 ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय येथील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सुरुवातीला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अ‍ॅप्रेंटीसधारक हे बेरोजगार आहेत. त्यांना सरळ सेवा अथवा कंत्राटी कामावर योग्य पगार देवून सामावून घेण्यात यावी, अशी अ‍ॅप्रेंटीसधारकांची मागणी आहे. यावेळी बैठकीला संघपाल सपकाळे, ईश्‍वर सोनार, राजु इंगळे, भरत परदेशी, गौरव सपकाळे, रेखा ठाकूर, ज्योती सपकाळे, किरण पाटील, नितीन सोनवणे, कृष्णकांत पाटील, नदीमखान यांच्यासह बहुसंख्य अ‍ॅप्रेंटीसधारक उपस्थित होते. निवेदन सादर करण्यासाठी आजी, माजी अ‍ॅप्रेंटीसधारकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.