दीपनगर राखेप्रकरणी प्रदुषण नियंत्रण कार्यालयात तक्रार

0

भुसावळ । विज निर्मितीमूळे होणारे प्रदुषण व त्यामूळे होणारे दुष्परिणामांना येथील स्थानिक नागरिक व शेतकरी यांनाच सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शिवसेनेतर्फे प्रदुषण नियंत्रण कार्यालयात तक्रार करण्यात आली. वीज निर्मितीनंतर या प्रकल्पातून दररोज साधारण 20 हजार 500 मेट्रिक टन राख निघत आहे. आधीच राखेने तुंडूब भरलेल्या वेल्हाळा बंडात ही राख सोडण्यात येत आहे, त्यामुळे विस्तारित प्रकल्पातून निघणारी राख डोकेदुखी ठरली आहे.

उपाययोजना कराव्या
दीपनगर प्रकल्पातून निघाणार्‍या राखेमुळे कंडारी, साक्री, फेकरी, वरणगाव, झेडटीसी परिसर, कठोरा बुद्रुक, कठोरा खुर्द, फुलगाव, पिंपरीसेकम व जाडगाव परिसरातील शेती पिकांवर विपरित परिणाम होत आहे. शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढलेल्या असून यावर उपाय योजना करण्यात दिपनगर प्रशासन अपयशी ठरलेले आहे. त्याबाबत प्रदुषण नियंत्रण कार्यालय जळगाव येथे शिवसेनेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली.