दीपनगर वसाहतीत दोन कर्मचार्‍यांसह ठेकेदारांना बजावली नोटीस

0
अतिरिक्त बांधकाम नष्ट करण्याचे आदेश
भुसावळ : दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या वसाहतीमध्ये अनधिकृतपणे अतिरिक्त बांधकामप्रकरणी जिल्हा परीषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी प्रशासनाला तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार प्रशासनाने दोन कर्मचारी व ठेकेदारांना नोटीस बजावून अतिरिक्त बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत.
जि.प.सदस्या पल्लवी सावकारेंच्या तक्रारीची दखल
दीपनगरातील नवीन इमारत ई 58/2 जवळ तसेच काहींनी मोटार वाहन ठेवण्यासाठी शेडची उभारणी केली आहे. या प्रकरणी जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी तक्रार केल्यानंतर मुख्य अभियंता आर. आर. बावस्कर यांनी गंभीर दखल घेतली आहे. गाळेवाटप समितीच्या माध्यमातून सर्वेक्षण करून बांधकाम आढळलेल्या दोन जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.
तर लागणारा खर्च ठेकेदाराकडून वसुल होणार
 वसाहतीमधील वैयक्तीक सोयींकरीती अनधिकृत बांधकाम केल्याचे दिसून येत असून ते त्वरीत पाडण्यात यावे अन्यथा भुसावळ औष्णिक वीजनिर्मिती केंद्र प्रशासनाच्या आदेशानुसार स्थापत्य विभागातर्फे सदरील बांधकाम पाडण्यात येईल तसेच या कारवाईसाठी लागणारा खर्च संबंधीत बांधकाम केलेल्या कर्मचारी व ठेकेदाराकडून वसूल केला जाईल, असे आदेश बजावण्यात आले आहेत.