भुसावळ । दीपनगर विद्युत केंद्रात अग्निशमन विभागाच्यावतीने 14 ते 20 एप्रिल दरम्यान अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी प्राणांची आहुती देणार्या अग्निशमन सेवेतील अधिकारी, कर्मचार्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अग्निशमन विभागाच्या प्रमुख इमारतीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता माधव कोठुळे तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपमुख्य अभियंता एल.बी. चौधरी आणि नितीन गगे उपस्थित होते. सर्व अधिक्षक अभियंता एम.पी. मसराम, आर.एम. राजगडकर, व्ही.एम. बारंगे, एन.आर. देशमुख, एम.बी. पेटकर, सी.एम. निमजे आणि एम.बी. अहिरकर उपस्थित होते.
बालमित्रांसाठी चित्रकला व रंगभरण स्पर्धा
शारदा माध्यमिक विद्यालयात 4 ते 15 वयोगटातील बालमित्रांसाठी चित्रकला व रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. वसाहतीमधील महिलांकरिता फायर फायटिंग, पर्यावरण आणि सुरक्षा या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. नवीन मनोरंजन केंद्रात अग्निशमन उपकरणांची प्रदर्शनी भरविण्यात आली होती. सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांसाठी आपले जीवन व संपत्ती वाचविणारा खरा सोबती – अग्निशामक या विषयावर निबंध आणि घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली.
एलपीजी गळतीबाबत प्रतिबंधात्मक उपाय
वसाहतीमधील डी.एम. सेक्टर, सुपर डी. सेक्टर, गणेश मंदिर भाग, ई.एम. सेक्टर, मार्केट एरिया आदी ठिकाणी अग्निशमन विभागाच्यावतीने स्वयंपाकाच्या एलपीजी गळतीबाबत प्रतिबंधात्मक उपाय व त्यांची प्रात्याक्षिके दाखविण्यात आली. सप्ताहाच्या समारोप प्रसंगी विविध स्पर्धांचा बक्षिस समारंभ करण्यात आला
यांनी केले सहकार्य
सात ही दिवस अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबवून अग्निशमन विभागाने वसाहतीमध्ये आगीच्या बाबतीत जनजागृती करण्यात मोठे यश मिळविले. बॉम्बस्फोट ठिकाणावरील बचाव कार्याबाबत प्रात्याक्षिके दाखविण्यात आली. वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख अग्निशमन अधिकारी ए.एस. देशमुख यांनी सप्ताहाचे अतिशय उत्कृष्ठ नियोजन केले. यासाठी सहाय्यक अग्निशमन अधिकारी व्ही.वाय. कोलनकर यांनी सहकार्य केले. सर्व कनिष्ठ अग्निशमन अधिकारी आर.एम. शिंदे, पी.सी. सपकाळे, एम.एम. पाटील, एम.एच. गायकर, ए.पी. रेवतकर, एम. अंभोरे, जे.एन. रेहपाडे, आर.एम. शिंदे, एस.बी. बागडे, रमित पोफारे तसेच सर्व यंत्र चालक आणि सर्व अग्निशामक यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.