मुंबई : बॉलीवूडच्या विवाहित जोड्यांच्या क्लबमध्ये आता दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंगचीही एन्ट्री झालेली आहे. इटलीतील लेक कोमो येथे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर विमानतळावर दोघांची पहिली झलक पाहायला मिळाली.
या नवदाम्पत्याला विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यावेळी दोघेही पांढऱ्या रंगाच्या पारंपरिक कपड्यात दिसले. दीपिका क्रिम कलरच्या सूटमध्ये असून गळ्यात मंगळसूत्र आणि हातात लाल रंगाचा चूडा घालून दिसली. त्याचबरोबर रणवीरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजामा आणि त्यावर जॅकेट परिधान केले होते.