मुंबई : गेल्या आठवड्यात दीपिका आणि रणवीर सिंगचे विवाहसोहळा पार पडला. इटलीतल्या लेक कोमो या नयनरम्य परिसरातील एका व्हिलामध्ये राजेशाही थाटात हा लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नातल्या फोटोंची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. सुरवातीला दोघानींही विधीचे फोटो गुपित ठेवले होते मात्र आता लग्नानंतर दोघेही सोशल मीडियावर मेहंदी, लग्नाचे विधीतळे काही फोटो पोस्ट करत आहेत.
https://www.instagram.com/p/BqZiDvIAFJQ/?utm_source=ig_embed
https://www.instagram.com/p/BqZlJnZgyIS/?utm_source=ig_embed
लग्नाच्या फोटोंसाठी चाहत्यांनी फार प्रतीक्षा केली होती. कारण १५ तारखेला संध्याकाळी या दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता इन्स्टाग्रामवर दोघांनीही बरेच फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये रणवीर आणि दीपिकाच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह सहज पाहायला मिळत आहे.
रणवीरने दीपिकाच्या मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत तर दीपिकाने रणवीरच्या मेहंदीचे. रणवीर आणि दीपिका आज सकाळीच मुंबईहून बंगळुरूला रवाना झाले आहेत. बंगळुरुमध्ये दीप-वीरने मित्रपरिवारासाठी स्वागतसमारंभाचं आयोजन केलं आहे. या रिसेप्शनची तयारी सुरू झाली आहे.