‘दीपस्तंभ’चे यजुवेंद्र महाजन नवी मुंबईमध्ये करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0

नेरुळ | स्पर्धेचे युग मानल्या जाणा-या आजच्या युगात विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणा-या महाविद्यालयीन विद्यार्थी युवक – युवतींना त्यादृष्टीने मार्गदर्शन व्हावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने रविवार, ६ ऑगस्ट रोजी विशेष मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यभरात २००५ पासून स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास, मूल्यशिक्षण, पालक प्रबोधन, शिक्षक प्रबोधन, गरजू होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अशा विविध प्रकारे २ लाख लोकांपर्यंत पोहचलेल्या दीपस्तंभ फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक तसेच ‘अभ्यास मित्र’, ‘करिअर मित्र’, ‘पालक मित्र’ अशा गाजलेल्या पुस्तकांचे लेखक व सुप्रसिध्द व्याख्याते यजुवेंद्र महाजन यांचे बहुमोल मार्गदर्शन या शिबीरामध्ये होणार आहे.

तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व इच्छुक युवक – युवतींनी रविवार, ६ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत होणा-या या मार्गदर्शन शिबीरप्रसंगी सकाळी ८.३० वा. नाव नोंदणी सुरू होत असल्याची दखल घेऊन आवर्जून उपस्थित रहावे व या विनामूल्य बहुमोल मार्गदर्शनचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात पालिकेतर्फे करण्यात आहे.