नवी दिल्ली । रियो ऑलिंपीक मध्ये चौथ्या स्थानावर राहिल्यानंतरही तीने त्यानंतर कोणत्याही स्पर्धात भाग घेतला नाही.येत्या काळात विश्व जिम्नास्टिक चॅम्पियन स्पर्धात ती खेळू शकणार नाही आहे.ती अजुनही तिच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून अजुनही बाहेर आलेली नाही. 23 वर्षीय खेळाडू दिपासाठी अजुन एक मोठा धक्का बसला आहे.या दुखापतीमुळे ती यावर्षी सुरू होणार्या आशियाई चॅम्पियन मध्ये भाग घेवू शकणार नाही आहे.तिचे एप्रिलमध्ये शस्त्रक्रिया झाली होती.
दुखापतीतून बाहेर येणे आव्हान असेल
यानंतर तिला 6 महिन्याचा कालावधी उपचारासाठी लागणार आहे. त्यानंतरच ती अभ्यास सुरू करू शकणार आहे. हि स्पर्धा ऑक्टोबर मध्ये कनाडा येथे होणार आहे. दुखापती बाबत बोलतांना दिपा म्हणाली की, दुखापती बाबात आपण काहीच करू शकत नाही. एका खेळाडूसाठी ही एक अत्यंत दुखाची गोष्ट असतो. मी आला धक्का न मानता एक आव्हान म्हणून घेईल. प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी बरोबर इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये थांबली आहे.तीने आता जॉगिंग सुरू केली आहे. मात्र सहा महिन्यांचा रिहैब संपल्यानंतरच अभ्यासाबाबत विचार करेल. दिपाचे प्रशिक्षक नंदी म्हणाले की विश्व चॅम्पियन स्पर्धासाठी तयारी होवू शकणार नाही.त्यामुळे तिचे लक्ष्य पुढच्या वर्षी येणार्या राष्ट्रमंडळ आणि आशियाई खेळावर आहे.मला नाही वाटत की तिने फक्त सहभागासाठी विश्व चॅम्पियन स्पर्धात जावे.या मोठ्या स्पर्धासाठी तयार होणे शक्य होणार नाही. या दुखापतीतून बाहेर पडले हे तिच्यासाठी आव्हान असणार आहे.