मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या थ्रिलर आणि बायोपिक सिनेमांचा ट्रेंड सुरु आहे. प्रेक्षकांची आवड पाहता आता दिग्दर्शक शिवमनेही मर्डर मिस्ट्री असलेला एक चित्रपट आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात सुनंदा पुष्कर यांच्या भूमिकेसाठी दीपिकाच्या नावाचीची चर्चा सुरु आहे.
हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री असून सुनंदा पुष्कर हत्याकांडावर तो आधारित असणार आहे. शशी थरुर यांच्याशी विवाह झाल्यानंतर काही वर्षांतच सुनंदा पुष्कर यांची हत्या झाली. त्यांचा मृतदेह दिल्लीतील एका ५ स्टार हॉटेलमध्ये सापडला होता. सध्या या खुनाचा खटला दिल्ली न्यायालयात सुरु आहे. या चित्रपटात शशी थरुर यांची भूमिका कोण साकारणार हे मात्र अद्यापही उघड झालेले नाही.