40,000 worth of materials from the farm in Dui Shivar मुक्ताईनगर : तालुक्यातील दुई येथील शेतकर्याच्या शेतातून चोरट्यांनी 40 हजारांचे साहित्य लांबवले. ही घटना 9 ते 10 रोजीच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
साहित्याच्या चोरीने शेतकरी संकटात
संदीप भागवत जावळे (45, दुई) यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या शेत गट क्रमांक 25 मधील शेताच्या खोलीतून चार हजारांची रोकड तसेच 20 हजार रुपये किंमतीची केबल तसेच 16 हजार रुपये किंमतीची वेगवेगळ्या किंमतीची केबल लांबवली तसेच खोलीतील टीव्ही, सेटटॉप बॉक्स तोडून नुकसान केले तसेच गावातील शेतकर्यांचे 160 फुट केबलमधून तांब्याची तार लंपास करण्यात आली. तपास नाईक धर्मेंद्र ठाकूर करीत आहेत.