दुकानातील दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

0

खऱेदीच्या बहाण्याने आले होते चोरटे; बोलण्यात गुंतवणूक केला पोबारा
पिंपरी-चिंचवड : सोने खरेदीच्या बहाण्याने दाखविण्यासाठी कांऊटरवर काढून ठेवलेले सुमारे दीड लाखांचे सोन्याचे दागिने बोलण्यात गुंतवून चोरट्याने लंपास केले. ही घटना त्रिवेणी नगर येथील तुळजा भवानी ज्वेलर्स येथे सकाळी दहाच्या सुमारास घडली. दुकान मालक अनिल बिले (वय 40 रा. रुपीनगर तळवडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी फिर्यादी यांच्या आई एकट्याच दुकानात होत्या. यावेळी एक अनोळखी इसम सोने खरेदीच्या बहाण्याने दुकानात आला. त्याने त्यांना बोलण्यात गुंतवून काही दागिने दाखविण्यास सांगितले. यावेळी चोरट्याने दुकानदार महिलेची नजर चुकवून दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने असलेला डबा घेऊन पसार झाला. याप्रकरणी निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.