दुखापतीने पैलवान घरी बसणार नाही!

0

पुणे । भारतात कुस्तीची परंपरा खुप जुनी आहे.या खेळाला भारतातील खेड्यापासून ते शहरातही खुप लोकप्रिय आहे.मात्र या खेळात उतरलेला कुस्तीपटू जेव्हा दुखापतीने जायबंदी होतो.त्याकडे कोणीच लक्ष देत नाही.त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नसतात तेव्हा तो या खेळातून काढता पाय घेतो ,मात्र आता भविष्यात असे होणार नाही. कुस्ती मल्लविद्या परिवार आणि सांगाती या सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन नुकतीच पुण्यात पैलवान वैद्यकीय सहाय्यता केंद्राची स्थापना केली आहे. त्यामुळे यापुढच्या काळात कोणत्याही दुखापतग्रस्त पैलवानाला वैद्यकीय उपचारांसाठी मदतीची प्रतीक्षा करावी लागणार नाही.

कुस्ती सोडण्याची वेळ येऊ नये
खेळांच्या परिभाषेत कुस्तीची कॉण्टॅक्ट स्पोर्टस अशी ओळख आहे. या खेळात लहानमोठ्या दुखापतीचा धोका संभवतो.घरची परिस्थिती चांगली नसली की, पैलवानांना उपचारांसाठी आर्थिक मदत मिळण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्या कालावधीत ती दुखापत अधिक गंभीर होण्याची भीती असते. परिणामी त्या पैलवानावर कुस्ती सोडण्याची वेळ येते.दुखापतीमुळे कोणत्याही खेळाडूला घरी बसण्याची वेळ येऊ नये किंवा कुस्ती सोडण्याची वेळ येऊ नये यासाठी कुस्ती मल्लविद्या वैद्यकीय सहाय्यता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून दुखापतग्रस्त पैलवानावर वेळेत उपचारांची सोय करण्यात येईल.