दुखापत केल्याप्रकरणी तिघांना शिक्षा

0

नगरदेवळा येथील घटनेतत पाचोरा न्यायालायाचा निकाल
नगरदेवळा – घरात कचरा टाकल्याच्या कारणावरून डोक्यावर लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या खटल्यात न्यायालयाने तिघांना दोषी ठरवून दोन वर्षे सहा महिने कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षातर्फे फिर्यादी जखमी साक्षीदार यांच्यासह आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली, सरकार पक्षासमोर आलेल्या पुराव्यावरून न्यायालयाने तिघांना दोषी ठरविण्यात आले.

आठ जणांची साक्ष नोंदविली
मोहम्मद सादिक रशीद बागवान यांनी घरात कचरा टाकल्याच्या कारणावरून शेख मजहर कादर, शेख सलीम कादर, शेख कादर यांनी सादिक रशीद बागवान यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना 1 जून 2014 रोजी घडली होती. प्रत्यक्ष दर्शनी रिझवान व इस्माईल हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी सादिक बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील यांनी करून दोषारोपपत्र पाचोरा न्यायालयात दाखल केले होते. पाचोरा न्यायालयाचे न्याय दंडाधिकारी एम एच हक यांच्या कोर्टात चौकशीच्या कामकाजात आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.