किनगाव-गिरडगाव दरम्यान अपघात
यावल- तालुक्यातील किनगाव – गिरडगाव दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक होत दोन जण गंभीर जखमी झाले त्यात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडला मयताचेे नाव मोहन यशवंत सोेनवणे – कोळी वय 35 रा. पाडळसे असे आहे. अंकलेश्वर – बर्हाणपूर राज्य मार्गावर यावल कडून चोपड्या कडे जातांना किनगाव- गिरडगाव दरम्यान वळणाचा रस्ता आहे या रस्त्यावर अनिल सिताराम वाघ वय 45 रा. मोठा वाघोदा ता. रावेेर हे दुचाकी क्रमांक एम. एच. 19 सी. एल. 9165 व्दारेे यावल कडून चोपडा कडे जात होते तर मोहन यशवंत सोनवणे- कोळी वय 35 रा. पाडळसे ता. यावल हा दुचाकी क्रमांक एम. एच. 19 सी. जी. 8823 व्दारेे किनगाव कडून यावल कडे येत होता दरम्यान वळणावर दोघांच्या दुचाकींची समोरा – समोर जबर धडकक झाली त्यात अनिल वाघ यांचा उजवा पाय मोडला गेला तर मोहन सोनवणे – कोळी यांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन रक्तबंबाळ अवस्थेत ती बेशुद्ध रस्त्यावर पडला अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पंचायत समितीचे उपसभापती उमाकांत पाटील कोळन्हावीचे गोटू सोनवणे सह नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली दोघं जखमींना किनगावचे राजु पाटील व नायगावचे कुर्बान तडवी यांनी जळगाव येथे शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले तर उपचारा दरम्यान सांयकाळी मोहन सोेनवणेे – कोळी याचा मृत्यू झाला मयताच्या पश्चात म्हातारी आई,लहान भाऊ, बहिण असा परिवार आहे. हातमजुरीवर उदर निर्वाह करणारे हेे कुटुंबातील तो कर्ता व्यक्ती होता.