दुचाकींच्या धडकेत दोघे गंभीर : किनगाव-गिरडगाव मार्गावर अपघात

0

यावल- किनगाव- गिरडगाव मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. किनगाव-गिरडगाव रस्त्यावरून मोठा वाघोदा येथील अनिल सीताराम वाघ (45) हे यावलकडून चोपड्याकडे जात असताना त्यांच्या दुचाकीची व किनगावकडून यावलकडे येणार्‍या मोहन सोनवणे (35, रा.पाडळसा) यांच्या दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात अनिल वाघ यांचा उजवा पाय मोडला तर मोहन सोनवणे यांना डोक्याला जबर दुखापत होऊन रक्तबंबाळ अवस्थेत ते रस्त्यावर बेशुद्ध झाले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पंचायत समितीचे उपसभापती उमाकांत पाटील, कोळ न्हावीचे गोटू सोनवणे यांच्या नागरीकांनी मदतीसाठी धाव घेतली. दोन्ही जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. यात मोहन सोनवणे यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.