भुसावळ : यावल तालुक्यातील मालोद येथे दुचाकीला धक्का लागल्याच्या व मागील भांडणाच्या कारणावरून लुकमान मेहताब तडवी यांना तिघांनी मारहाण केली. या प्रकरणी हुसेन रमजान तडवी, असलम रमजान तडवी व रमजान जबरा तडवी यांच्याविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.