दुचाकीची तोडफोड करत टोळक्याची दहशत

0
चिंचवडमधील केएसबी चौकातील घटना
चिंचवड : दुचाकीची तोडफोड करत पाच जणांच्या टोळक्याने लोखंडी कोयता आणि लाकडी दांडके घेऊन परिसरात दहशत पसरवली. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री सव्वानऊच्या सुमारास चिंचवड मधील केएसबी चौकात घडली. रामकृष्ण कान्हूकर (वय 43, रा. करविन हाउसिंग सोसायटी, शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संदीप कालिदास भोसले (वय 21, रा. विद्यानगर  बस स्टॉपच्या पाठीमागे, चिंचवड), रितेश जाधव, कृष्णा जगताप, बंटी तुपे, रतन काळे (सर्व रा. विद्यानगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामकृष्ण यांच्या दुचाकीची तोडफोड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास फिर्यादी रामकृष्ण यांनी केएसबी चौकातील हॉटेल गोल्डन रक समोर त्यांची दुचाकी लावली होती. त्यावेळी आरोपींनी हातात कोयता, लाकडी दांडा तसेच स्टंप घेऊन चौकात गोंधळ घातला. तसेच दहशत पसरविण्याच्या उद्देशाने रामकृष्ण यांच्या दुचाकीची तोडफोड केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संदीप भोसले या आरोपीला अटक केली आहे. तर अन्य आरोपी फरार आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.