दुचाकीवरून गावठी दारू घेऊन जाणार्‍यास पकडले

0

जळगाव। हरीविठ्ठलनगर परिसरात शुक्रवारी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून 100 लीटर गावठी दारूची वाहतूक करणार्‍याला रामानंदननगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरूध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरीविठ्ठलनगराकडून खंडेरावनगराकडे जाणार्‍या रस्त्यावर शुक्रवारी पहाटे दुचाकीवरून (क्र. एमएच-19-टी-5042) जाणार्‍याला पोलिसांच्या गस्ती पथकाने थांबण्यास सांगितले. मात्र त्याने दुचाकी सुसाट वेगाने खंडेरावनगराकडे घेऊन गेला. त्याला पाठलाग करून पोलिसांनी पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ असलेल्या बॅगेत काळ्यात रंगाच्या ट्युबमध्ये 4 हजार रुपये किमतीची 100 लीटर दारू होती. त्याला ताब्यात घेऊन अतुल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.