दुचाकीवरून तोल जावून पडल्याने 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

A woman in Bhusawal died after falling from a bike  भुसावळ : दुचाकीवरून पडल्याने शहरातील 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अंजली गुलाब पवार (45, वांजोळा रोड, राजस्थान मार्बलच्या मागे, भुसावळ) असे मयत महिलेचे नाव आहे.

बाजारपेठ पोलिसात नोंद
अंजली पवार या 1 ऑगस्ट 2022 रोजी दुचाकीवरून जात असताना महामार्गावरील रेल्वे पुलावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले होत मात्र उपचार सुरू असताना 7 ऑगस्ट रोजी पहाटे पावणेतीन वाजता त्यांचा मृत्यू झाला होता. सुरूवातीला नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर ती भुसावळ बाजारपेठ पोलिसात बुधवारी वर्ग करण्यात आला. तपास नाईक शशीकांत तायडे करीत आहेत.