यावल- दुचाकीवरून तोल जावून पडल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना सोेमवारी सायंकाळी यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर घडली. प्रमिला अशोक सदानशिव (55, रा.भुसावळ) असे जखमी महिलेचे नाव आहे. सुधाकर अशोक सदानशिव हे दुचाकीने चोपड्याहून भुसावळला जात होते. या दरम्यान यावल शहरातील भुसावळ रस्त्यावरील फालक नगरजवळ गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकी डगमगली. त्यात मागे बसलेल्या प्रमिलाबाई या दुचाकीवरून खाली कोसळून त्यांच्या डोक्यास दुखापत झाली. यावल ग्रामीण रुग्णालयात संगीता डहाके, गुलाम अहमद यांनी प्रथमोपचार केले. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना तत्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले.