दुचाकीस्वाराचा मृत्यू

0

बारामती: बारामतीवरून पारवडीकडे निघालेल्या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात विश्‍वास रघू नांगरे (वय 50 रा. पारवडी) असे मृताचे नाव आहे. 31जुलैला रात्री साडेआठ वाजता बारामती नजीकच्या जैनकवाडी फाटयाजवळ रिक्षाने दुचाकीला जोरात धडक दिली.

या अपघातात विश्‍वास नांगरे यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  या अपघातातील रिक्षाचालक हा पळून गेला आहे. या घटनेचा तपासा पोलिस हवालदार कदम करीत आहेत. नांगरे हे सर्वांना सहकार्य करीत असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे पारवडी गावात शोककळा पसरली आहे.