देहुरोड : काही दिवसांपूर्वी मासुळकर फार्म हाऊस समोर दुचाकीस्वारास लुटण्यात आले. कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील किंमती साहित्य पळवून नेले होते. देहुरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बळजबरींने दुचाकीवर बसवुन अंधारात नेत त्याच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाइल असा 72 हजारांचा माल चोरुन नेला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आली आहे. यामधील एक अल्पवयीन आहे. गुन्हा दाखल झाल्यावर डीबी पथकांने खबर्यांच्या सहाय्याने गुन्हयाचा तपास केला. सोन्या उर्फ समीर जालींदर बोडके (वय 24, रा. गहुंजे) यास आणि त्याचा अल्पवयीन साथीदार अशा दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. चोरलेले दागिने, मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. दुचाकी व कोयताही जप्त केला असुन आरोपी बोडके सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज पवार, पोलीस नाईक प्रमोद उगले, योगेश जाधव, मयुर जगदाळे, सुमित मोरे, सागर शेळके यांनी कारवाईत सहभाग घेतला.