दुचाकीस्वाराला वाचवताना बस कलंडली

0

खालापुर : मुंबई – करमाळा ही एसटी महामंडळाची बस खोपोलीकडून खंडाळा घाटातून पास होती. या दरम्यान एका दुचाकीस्वाराला वाचवताना ही बस कठडा ओलांडून खाली दरीकडे झूकून उभी राहिली. ही घटना बुधवारी सकाळी 7 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास घडली. नंतर चालकाच्या लक्षात आले की, खाली काही घरं व खोल दरी होती. या घटनेत संभाव्य मोठा अनर्थ टळला. वाहक आणि चालकांनी पहिल्यांदा सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढले. तो वर हे वृत्त खोपोली अपघात ग्रस्त मदतीसाठी सक्रिय ग्रुपचे सदस्य नितीन भावे, शेखर जांभळे यांना माहिती झाल्यावर त्यांनी सदर घटना इतरांना कळवली. काही क्षणात टीम घटना स्थळी हजर झाली. गुरुनाथ साठेलकर, अमित खिस्मतराव, शेखर जांभळे यांनी पोलीस स्टेशन, आयआरबी व बोरघाट पोलीस यंत्रणेला संपर्क साधला दरम्यान जखमी बाईक स्वाराला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले.