दुचाकी अपघातातील ईचखेड्याच्या दुसर्‍या जखमीचाही मृत्यू

0

यावल- दोन दुचाकी समोरा-समोर धडकून झालेल्या तीन जण जखमी झाले होते तर त्यातील एकाचा उपचार सुरू असताना जळगाव येथे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच दुसर्‍या एका जखमीचा औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने ईचखेडा गावावर शोककळा पसरली आहे. इम्रान अरमान तडवी (30) असे मयताचे नाव आहे

किनगाव-ईचखेडा दरम्यान झाला होताा अपघात
तालुक्यातील किनगाव-इचखेडा गावादरम्यान सोमवारी दुचाकींची समोरासमोर धडक झाली होती. यात तीन जण गंभीर जखमी झाले होते. जखमींपैकी शुभम धनराज शिंदे-पाटील (19, रा. लोहारा, ता.पाचोरा) या तरुणाचा मंगळवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता तर दुसरा जखमी इम्रान अरमान तडवी (30) याचा औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना बुधवारी मृत्यू झाला. इम्रानच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ईचखेडा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.