दुचाकी अपघातात ग्रामसेवक ठार

0

जळगाव । मोबाईलवर कॉल आल्याने रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून मोबाईलवर बोलत असलेल्या ग्रामसेवकाच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने उडविल्याची घटना सोमवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास कालिंका माता चौफुलीजवळ घडली. यात भडगाव तालुक्यातील करंजी येथील ग्रामसेवक संतोष लक्ष्मणराव म्हैत्रे (वर-45 रा. शिरसोली) हे जागीच ठार झाले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी होवून महामार्गावर वाहतुक ठप्प झाली होती. नागरिकांनी म्हैत्रे  यांनी  जिल्हा सामान्य रूग्णालयात नेले. परंतू, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. संतोष म्हैत्रे यांच्या पश्‍चात पत्नी व एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.