दुचाकी अपघातात धरणगावातील दोघे तरुण जागीच

धरणगाव : शहरातील दोघा तरुणांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात चोपडा रोडवरील पिंपळे गावाजवळ मंगळवार, 9 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडला. प्रदीप पाटील (23) व किशोर पाटील (31, संजय नगर, धरणगाव) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

धरणगावात शोककळा
शहरातील संजय नगर भागातील रहिवासी प्रदीप पाटील (23) आणि किशोर पाटील (31) हे दोघे तरुण मंगळवारी कामानिमित्त चोपडा येथे गेले असता परतीच्या प्रवासात दुपारी पिंपळे गावाच्या फाट्याजवळ असलेल्या नायरा पेट्रोल पंपाच्या वळणावर त्यांच्या दुचाकीला (एम.एच.19 सी.एच.3894) अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर अपघाताचे भीषणता पाहून अनेकांचे मन हेलावले.अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणारे मंडळी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.