दुचाकी, कारला बसची जोरदार धडक

0

जळगाव : महामार्गावरील गोदावरी कॉलेजजवळ समोरून येणार्‍या मोपेड दुचाकीवर असलेल्या महिलेला कारचा धक्का लागला. याचवेळी भरधाव वेगात आलेल्या एसटी बसने कारला मागून धडक जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नसून कार व दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली असून एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

अशी घडली घटना
अमळनेर येथील दिपक विक्रम पाटील हा (एमएच 19 एएक्स 4025) क्रमांकाची इंडिका घेवून जळगाव एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी महामार्गावरील गोदावरी कॉलेज जवळून वळत असतांना नशिराबाद करून आलेल्या मोपेड दुचाकीवर असलेल्या महिलेला कारचा धक्का लागला. सुदैवाने महिलेला दुखापत झाली नाही. परंतू मोपेड दुचाकीचे नुकसान झाले. याचवेळी मागून भरधाव वेगात आलेल्या (एमएच 06 एस 8631) क्रमांकाच्या जळगाव-मुक्ताईनगर बसने वळणावर (एमएच 19 एएक्स 4025) क्रमांकाच्या इंडिका कारला धडक दिली. या अपघातात कारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून बस व अपघातग्रस्त इंडिका ताब्यात घेतली आहे. एमआयडीसी पोलिसात कारचालक दिपक पाटील यांच्या फिर्यादीवरून बसचालक दिलीप नागारुत (रा. मुक्ताईनगर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखलचे काम सुरु होते.