निगडी : भरधाव वेगात जाणारी दुचाकी अचानक घसरली. वेग जास्त असल्याने दुचाकी काही अंतरापर्यंत घसरत गेली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी पावणेतीनच्या सुमारास निगडी जकात नाक्याजवळ पुणे लेनवर झाला. प्रशांत कांबळे (वय 44, रा. कल्याण) असे अपघातात मृत्यू झालेली दुचाकीस्वाराने नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत देहूरोड वरून निगडीच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. त्यांच्या दुचाकीचा वेग जास्त होता. अचानक त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे दुचाकी लांब अंतरापर्यंत घसरत गेली. यामध्ये प्रशांत गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.