भुसावळ- दुचाकीची चावी काढल्याच्या वादातून झालेल्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी डी.एल.हिंदी हायस्कूलसमोर झालेल्या घटनेप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. उज्वल कृष्णा लोहार दुचाकीने जात असताना आवेज शेख याने त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली. यावरून दोघांमध्ये शाद्बीक चकमक झाली. यावेळी गुफरान शेख याने लोहारच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारून जखमी केले, तर समीर गवळी यानेही लोहारला ममारहाण केली. जखमी लोहार यांच्यावर जळगाव येथे उपचार करण्यात आले. लोहार यांचा मित्र प्रद्युम्न रोकडे हा भांडण सोडवण्यासाठी गेला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी संशयित आवेज शेख, गुफरान शेख आणि गवळीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. हवालदार माणिक सपकाळे पुढील तपास करत आहेत.