Dhamangaon two wheeler thief handcuffed by Jalgaon crime branch जळगाव : जिल्ह्यातील धामणगाव गावातील ईश्वर जगन्नाथ सपकाळे यास दुचाकी चोरी प्रकरणी मंगळवारी जळगाव गुन्हे शाखेने खोटे नगरातून अटक केली आहे. आरोपीने शेतकर्याच्या बांधावरील दुचाकी लांबवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
शेताच्या बांधावरून लांबवली दुचाकी
जळगाव तालुक्यातील शेतकर्याची बांधावरील दुचाकी चोरून नेल्याची घटना घडल्याने तालुका पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे, हवालदार जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे यांच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या.