जळगाव : शहरातील टॉवर चौकातील जिल्हा काँग्रेस भवनासमोरून तरुणाची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर पोलिसात गुन्हा दाखल
निलेश जीवन भाट (30, कंजरवाडा, सिंधी कॉलनी, जळगाव) हा चालक असून खाजगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करतो. गुरुवार, 14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरातील टॉवर चौकात दुचाकी (एम.एच.19 बी.झेड.3715) न आल्यानंतर दुचाकी काँग्रेस भवन समोर पार्क केली मात्र बाजारातून परतल्यानंतर चोरट्यांनी 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. मंगळवार, 19 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.