दुचाकी चोरट्याला न्यायालयीन कोठडी

0

जळगाव। कुसूंबा गावातील मोटारसायकल चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयिताची पोलिस कोठडीची मुदत संपली असता त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवागनी करण्यात आली आहे.

कुसूंबा गावातील गणपती नगरातील रहिवासी विकासा आत्माराम पाटील यांची मोटारसायकल क्रं. एमएच.19.सीजी.9215 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी मोटारसायकल चोरीप्रकरणी भूषण उर्फ जिगर रमेश बोंडारे (वय 30, रा. उमाळा) याला अटक केली होती. त्यानंतर 7 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज शुक्रवारी भुषण बोंडारे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपली असता त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवागनी केली आहे.

दरम्यान, एमआयडीसी पोलिस कर्मचारी भगिरथ नन्नवर हे संशयित भुषण बोंडारे यास कुसुंबा खुर्द गावातील प्राथमिक शाळेजवळ राहणार्‍या देशमुख कुटूंबियांच्या घरात चोरी करून 41 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी ताब्यात घेणार आहेत.