दुचाकी झाडावर आदळली; वढोद्याचे दोन जखमी

0

यावल- भरधाव दुचाकी झाडावर आदळून दोन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता वढोदा (ता.यावल) गावाजवळ घडली. अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर शुक्रवारी दुचाकीद्वारे भीमराव नारायण सोनवणे (42) आणि देवेंद्र दत्तात्रय सोनवणे (30, दोन्ही रा.वढोदा) हे गावाकडे जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी झाडावर आदळून दोघे जखमी झाले.