हॉटेल सुझोकी जवळील घटना; एक गंभीर जखमी
जळगाव – जळगावात खासगी रूग्णालयात दाखल असलेल्या पत्नीला पाहण्यासाठी दुचाकीने शालकासोबत एरंडोलकडून जळगावकडे जात असतांना भरधाव दुचाकी समोरून येणाऱ्या टाटा मॅजिकला जोरदार धडक दिल्याने दुचाकीचालक आणि टाटामॅजिक चालक जागीच ठार झाले तर दुचाकीवर मागे बसलेला गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास जळगाव-पाळधी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल सुझोगी जवळ झाली आहे. बन्सीलाल सुभाष राठोड (वय- 30) रा. हिसाडे ता.शिरपूर जि.धुळे आणि दिवाकर नारायण सोनकर (वय-48) रा. सहयोग कॉलनी, पिंप्राळा अशी मयतांची नावे असून अर्जून उत्तम पवार (वय-35) रा. खडकातांडा ता.एरंडोल हे जखमी झाले आहे.