दुचाकी धडकल्याचा जाब विचारल्याने एकावर कटरने हल्ला : दोघांविरोधात गुन्हा

Two injured in clash in Gojora : Conflicting case registered भुसावळ : भरधाव दुचाकीने पाठीमागून धडक दिल्यानंतर झालेल्या नुकसानीची भरपाई मागितल्यानंतर वाद वाढल्याने एकाने कटर मारून जखमी केल्याची घटना कुर्‍हा-भुसावळ रस्त्यावर शनिवार, 29 रोजी रात्री 8.30 वाजता घडली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला.

कटरने वार करीत केले जखमी
योगेश उर्फ विठ्ठल तुकाराम चौधरी (24, गोजोरा, ह.मु.पांडेसरा, सुरत) यांच्या तक्रारीनुसार, कुर्‍हा-भुसावळ रस्त्यावरील सुशीला जिनींगजवळ शनिवारी रात्री संशयीत अल्ताफ अली अकबर अली (मुस्लीम कॉलनी, खडका रोड, भुसावळ) याने पाठीमागून येवून दुचाकीला धडक दिल्याने नंबरप्लेटचे नुकसान झाले तसेच इंडिकेटर तुटल्याने त्याची भरपाई म्हणून पाचशे रुपये मागितल्यानंतर आरोपी अल्ताफने खिशातील कटरद्वारे मानेवर तसेच हातावर हल्ला करीत जखमी केले.

दुसर्‍या तरुणाचीही मारहाणीची तक्रार
दरम्यान, अल्ताफनेदेखील याच कारणावरून तक्रार दिली असून संशयीत वैभव चौधरी व योगेश तुकाराम चौधरी (गोजोरा) यांनी दुचाकी अडवून शिविगाळ करीत मारहाण केल्याचा आरोप केला आहे तसेच धारदार शस्त्राने उजव्या हाताच्या खांद्याजवळ दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास नाईक दीपक जाधव करीत आहेत.