शहादा । तालुका दुध उत्पादक संघाची पंचवार्षिक निवडणूक सातपुडा साखर कारखाना चेअरमन दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. गेल्या 25 वर्षांपासून दूध संघाची निवडणूक बिनविरोध राहण्याची परंपरा कायम राहिली. सर्वसाधारण गटाच्या 10 महिला राखीव 2 इतर मागासवर्ग अनुसुचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती साठी प्रत्येकी एक अशा एकूण 15 जागांसाठी निवडणूक झाली. राखीव पाच जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. सर्वसाधारण 10 जागासाठी 11 उमेदवार निवडणूक रिंगणात होते उमेदवारी माघारीच्या दिवशी जि. प . सदस्य अभिजीत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
बिनविरोध निवडून आलेले संचालक
सुनील पाटील, विजय पाटील, अनिल पाटील, प्रभाकर पाटील, गोपाल पाटील, आनंद पाटील, युवराज पाटील, रवींद्र राऊळ, भीमा भरवाड, रोही चव्हाण, सुधीर पाटील, दरबारसिंग पवार, तापीबाई पाटील, मंगलाबाई पाटील, शिवदास चव्हाण यांचा समावेश आहे. नूतन संचालकांचे सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, नगरसेवक मकरंद पाटील, उद्धव पाटील , उपनगराध्यक्ष रेखाबाई चौधरी, भरत चौधरी, संजय चौधरी, के. डी. पाटील यांनी अभिनंदन केले. बिनविरोध निवडीमुळे तालुका दूध संघामध्ये सकारात्मक बदल होऊन दूध उत्पादकांच्या फायद्याचे निर्णय होतील, अशी अपेक्षा आहे.